Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

रामोजी राव यांचे निधन

  • वृत्त आणि मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवणारे ज्येष्ठ माध्यमसम्राट आणि रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.

अल्पपरीचय:

  • आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात 16 नोव्हेंबर 1936 रोजी जन्मलेले रामोजी राव यांनी सन 1962 मध्ये ‘मार्गदर्शी चिट फंड’ कंपनी सुरू केली.
  • 1969 मध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नदाता मासिक सुरू केले
  • याशिवाय ‘ईनाडू'(1974) वृत्तपत्र, ईटीव्ही वृत्तवाहिनी समूह, रामोजी फिल्म सिटी, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, चित्रपट निर्माती कंपनी उषाकिरण मूव्हीज, प्रिया फूड्स,एनबीएफसी आदी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी आंध्र प्रदेश व तेलंगणसह अन्य राज्यांतील लाखो नागरिकांना नोकऱ्या दिल्या.
  • रामोजी फिल्म सिटीचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने जगातील सर्वांत मोठी फिल्म सिटी म्हणून गौरव केला आहे.
  • हैदराबादला लागून असलेल्या या फिल्म सिटीमध्ये एस. एस. राजामाऊलींच्या ‘बाहुबली’ सह जवळपास सर्वच भारतीय भाषांतील हजारो चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
  • आंध्र प्रदेशातील माध्यम उद्योगात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या रामोजी राव यांना ‘पद्मविभूषण'(2016) ने सन्मानित करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *