● भूराजकीय आणि भूआर्थिक घडामोडींविषयी भारताने आयोजित केलेल्या रायसीना परिषदेचे उद्घाटन 17 मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
● न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांच्यासह 125 देशांचे सुमारे 3500प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
● परदेशी प्रतिनिधींमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तवार्ता संचालक तुलसी गॅब्बार्ड, युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांचा समावेश आहे.
● 2025 ची होणारी परिषद या मालिकेतील दहावी आहे.
● यावेळी प्रथमच या परिषदेमध्ये तैवानच्या संरक्षण दलातील एक उच्चपदस्थ सहभागी होणार आहेत.
● न्यूझीलंडचे पंतप्रधान या परिषदेचे बीजभाषण करतील.
● ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने या संवादाचे आयोजन केले आहे.