महाराष्ट्राने ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत इतिहास घडवला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या गटांनी विजेतेपद पटकावले. दोन्ही गटात महाराष्ट्राने कर्नाटकावर मात केली. सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राने या स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातील टिपटूर येथील कल्पतरू क्रीडांगणावर ही स्पर्धा झाली.
महाराष्ट्राची लक्षवेधी कामगिरी
• महाराष्ट्राची आठव्यांदा दुहेरी मुकुटाची कमाई.
• राज्याच्या ज्युनिअर मुलांचे 12 वे तर मुलींचे 17 वे अजिंक्यपद.
• लागोपाठ तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राला दुहेरी मुकुटाचा मान.