- मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, शेतक-यांना शाश्वत उपजीविका प्रदान करण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या प्रभावी विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
- भारतातील देशी गोवंशाच्या जाती मजबूत आहेत आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अनुवांशिक क्षमता त्यांच्याकडे आहे.
- स्थानिक गोवंश जातींचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि विकास करण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2014 मध्ये “राष्ट्रीय गोकुळ मिशन ” सुरू करण्यात आले.
- राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, 2021 पासून हा विभाग दूध उत्पादक शेतकरी, दुग्ध सहकारी संस्था/एमपीसी /एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करत आहे.
- यावर्षी देखील खालील श्रेणींसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे:
- देशी गायी/म्हशींच्या जातींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी,सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघटना,सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ
- या वर्षापासून, विभागाने ईशान्य क्षेत्रातील राज्यांसाठी विशेष पुरस्कार समाविष्ट केला आहे जेणेकरुन ईशान्य प्रदेशातील दुग्ध विकास उपक्रमांना प्रोत्साहन आणि चालना मिळेल.
- राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 वर नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील ईशान्य क्षेत्र राज्यांसाठी 1ला, 2रा, 3रा आणि एक विशेष पुरस्कार प्रदान करेल.
1) 5,00,000/-रुपये ( पाच लाख रुपये फक्त) -पहिला क्रमांक
2) 3,00,000/-रुपये ( तीन लाख रुपये फक्त) -दुसरा क्रमांक आणि
3) 2,00,000/-रुपये (दोन लाख रुपये फक्त) -तृतीय क्रमांक
- 2,00,000/-रुपये ( दोन लाख रुपये फक्त) – ईशान्य क्षेत्रासाठी विशेष पुरस्कार.
- सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ श्रेणीच्या बाबतीत, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2024 मध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र आणि केवळ स्मृतिचिन्ह असेल.
- 2024 वर्षात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी नामांकन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल द्वारे ऑनलाइन https://awards.gov.in दाखल केले जातील आणि07.2024 पासून सुरू होईल आणि नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31.08.2024 असेल.
- राष्ट्रीय दूध दिनानिमित्त (26 नोव्हेंबर 2024) हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.