● राष्ट्रीय जनसहयोग आणि बाल विकास संस्थेचे (NIPCCD) सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असे अधिकृतपणे नामांतर करण्यात आले आहे.
● यामधून भारतातील महिला आणि बालकांच्या विकासासाठी प्रदेश-निहाय , ध्येय-प्रेरित समर्थनावर संस्थेचा भर अधोरेखित झाला आहे.
● केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली हे परिवर्तन झाले आहे.
● सर्वदूर काम करण्याच्या आणि प्रादेशिक क्षमता-निर्मिती मजबूत करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, झारखंडमधील रांची येथे 4 जुलै,2025 रोजी या संस्थेच्या अंतर्गत एका नवीन प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
● झारखंड, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या पूर्वेकडील प्रदेशांवर विशेष लक्ष देत मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, आणि मिशन सक्षम अंगणवाडी आणि मिशन पोषणचा दुसरा टप्पा या केंद्रीय मंत्रालयाच्या प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसाठी हे केंद्र विशेष प्रशिक्षण आणि संशोधनाची आवश्यकता पूर्ण करेल.
● एनआयपीसीसीडीचे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असे नामांतर करणे,ही भारतातील एका अग्रणी समाजसुधारकाच्या वारशाला दिलेली आदरांजली आहे आणि महिला आणि बाल-केंद्रित विकासाप्रति आमची वचनबद्धता अधोरेखित करत आहे, असे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यासंबंधी आपले मत व्यक्त केले.