राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर
- राष्ट्रीयमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर राहटकर यांची निवड करण्यात आली.
- हीनिवड 3 वर्षांसाठी असेल.
- रेखाशर्मा यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील.
- राष्ट्रीयमहिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल
- रहाटकरया आयोगाच्या 9 व्या अध्यक्ष आहेत.
- याशिवायअर्चना मुजुमदार यांची आयोगावर सदस्य म्हणून तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली.
- महिलाआयोग ही वैधानिक संस्था असून महिलांच्या हक्कासाठी कार्यरत आहे.
- महिलांच्याउन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांचा फेर आढावा घेणे, संसदीय वैधानिक शिफारशी करणे ,महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचे संशोधन करणे ,त्यांच्या अडचणींची दखल घेऊन कारवाई करणे इत्यादींचा त्यात समावेश आहे.
- 1992 मध्येविशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत.
- रहाटकरयांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून (2016 ते 2021ल या काळात काम केले आहे.
- यादरम्यानरहाटकर यांनी सक्षमा, प्रज्वला, सुहिता यासारखे अनेक महिला केंद्रित उपक्रम राबविले होते .
- छत्रपतीसंभाजी नगरच्या महापौर म्हणून देखील त्यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले आहेत.
राष्ट्रीय महिला आयोग:
- स्थापना: 31 जानेवारी 1992
- मुख्यालय: नवीदिल्ली
- पहिल्याअध्यक्षा : जयंती पटनायक
भारत – ओमान यांच्यात नसीम – अल – बहर संयुक्त सराव
- आयएनएसत्रिकंद आणि सागरी क्षेत्रातील हवाई गस्तीच्या डॉर्निअर विमाने आणि ओमानच्या नौदलाचे (Royal Navy) अल सीब हे जहाज यांच्यात नसीम – अल – बहर हा द्विपक्षीय संयुक्त सराव नुकताच पार पडला.
- 13 ते18 ऑक्टोबर 2024 या कालावधीत गोवा इथे या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
- हाद्विपक्षीय संयुक्त सराव दोन टप्प्यामध्ये पार पडला.
- याअंतर्गत13 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधी दरम्यान झालेल्या पहिल्या टप्प्यात बंदराच्या ठिकाणी सरावाअंतर्गतचे उपक्रम राबवले गेले, तर हार्बर टप्पा आणि त्यानंतर सागरी क्षेत्रातील सरावाअंतर्गतचे उपक्रम राबवले गेले.
- यासरावा अंतर्गच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांच्या नौदलांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाविषयक संवादांचेही आयोजन करण्यात आले होते.
- यातविविध विषयांमधल्या तज्ञतेची देवाण घेवाणि, तसेच नियोजन विषयक परिषदांचा समावेश होता.
- यासोबतच या संयुक्त द्विपक्षीय सरावाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजित करण्यात आले होते.
- सरावाच्याटप्प्यादरम्यान, दोन्ही देशांच्या जहाजांनी भूपृष्ठावरील लक्ष्य भेदणे, कमी पल्ल्याच्या अंतरातील विमान प्रतिरोधक गोळीबार, युद्ध सराव आणि समुद्रातील जहाजांमध्ये इंधनाचा पुनर्भरणा करण्यासारख्या (Replenishment at Sea Approaches – RASAPS) असंख्य अभिनव उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
- भारताच्याआएएनस त्रिकंदवर तैनात हेलिकॉप्टर आणि ओमान नौदलाच्या अल सीब या जहाजाने क्रॉस – डेक लँडिंग तसेच हवेतून इंधनाचा पुनर्भरणा करण्यासारख्या (Vertical replenishment – VERTREP) सराव उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.