नाशिक येथे आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात यजमान महाराष्ट्रानं विविध कलाप्रकारात वर्चस्व गाजवत सांघिक विजेतेपद पटकावलं आहे. 12 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या या महोत्सवाचा 16 जानेवारी रोजी समारोप झाला.
अधिक माहिती
● हरयाणानं द्वितीय, तर केरळनं तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवलं.
● नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
● या महोत्सवातल्या, विविध आठ कलाप्रकारांमधल्या विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आल.
● प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख दीड लाख रुपये, द्वितीय क्रमांक एक लाख, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना 75 हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आले.
● समुह लोक नृत्य स्पर्धेत महाराष्ट्र संघानं प्रथम, केरळ द्वितीय, तर पंजाबनं तृतीय क्रमांक पटकावला.
● लोकगीत समूह प्रकारात केरळ प्रथम, पंजाबनं द्वितीय, तर राजस्थाननं तिसरा क्रमांक मिळवला.
● याशिवाय व्यक्तिगत कला प्रकारातील विजेत्यांनाही पुरस्कार देण्यात आले.
विविध कलाप्रकारातील विजेते खालीलप्रमाणे आहेत.
● सांघिक विजेतेपद : 1. महाराष्ट्र, 2. हरयाणा, 3. केरळ
● लोक नृत्य (समूह) : 1. महाराष्ट्र, 2. केरळ, 3. पंजाब
● लोकनृत्य (वैयक्तिक) : 1. सृष्टी भारद्वाज, उत्तराखंड 2. सनी कुमार, हरयाणा 3. धनिष्ठा काटकर, महाराष्ट्र
● लोकगीत (समूह) : 1. केरळ, 2. पंजाब, 3. राजस्थान
● लोकगीत (वैयक्तिक) : 1. पृथ्वीराज (महाराष्ट्र), 2. उमा वर्मा ( मध्य प्रदेश) आणि
3. छायारानी मेलांग (आसाम).
● घोष वाक्य सादरीकरण : 1. परिशा मिधा (दिल्ली), 2. कार्तिकेय शर्मा (राजस्थान), 3. शिखा (मध्य प्रदेश).
● कथालेखन : 1. सृष्टी दीक्षित (उत्तर प्रदेश), 2. माही जैन (हरयाणा) आणि 3. नव्या एन. (केरळ)
● पोस्टर मेकिंग : 1. साहीलकुमार (हरयाणा), 2. महक सैनी (चंदीगड) आणि 3. सौराद्युती सरकार (त्रिपुरा).
● छायाचित्रण : 1. संकल्प नायक (गोवा), 2. सिमरन वर्मा (दिल्ली) आणि 3. फुन फुन लुखाम (अरुणाचल प्रदेश)