‘यंग व्हॉइसेस: एनगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन’ या संकल्पनेवर या वर्षी राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 या कालावधीत देशभरात हा महोत्सव झाला. या युवा संसदेचे आयोजन देशातील 785 जिल्ह्यांमध्ये तीन स्तरांवर करण्यात आले.
अधिक माहिती
• 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्हा युवा संसद आयोजित करण्यात आली. त्यातील विजेते 19 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्य युवा संसदेत सहभागी झाले.
• 5 आणि 6 मार्च 2024 रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसदेची अंतिम फेरी झाली. त्यात 87 राज्यस्तरीय विजेत्यांपैकी 29 (प्रत्येक राज्य युवा संसदेतील प्रथम स्थानधारक) जण त्यांना दिलेल्या विषयांवर बोलले. त्यातून पहिले तीन विजेते जाहीर करण्यात आले. उर्वरित 58 प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिले.
पुरस्कार विजेते
• हरयाणातील यतीन भास्कर दुग्गल (प्रथम पारितोषिक)
• तमिळनाडू येथील वैष्णा पिचाई (द्वितीय पारितोषिक)
• राजस्थानची कनिष्का शर्मा (तृतीय पारितोषिक विजेती)
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसेच केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसद महोत्सव, 2024 च्या समारोप समारंभाला संबोधित केले.
पार्श्वभूमी
• युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या माध्यमातून जिल्हा युवा संसद, राज्य युवा संसद आणि राष्ट्रीय युवा संसद आयोजित केली होती.
• लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करणे हा या युवा संसदेचा उद्देश होता.
• शिस्त लावणे, इतरांच्या दृष्टिकोनाबाबत सहिष्णुता निर्माण करणे तसेच युवकांना तरुणांना संसदेच्या पद्धती आणि कार्यपद्धती समजावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
• नागरिकांच्या सक्रियतेबद्दल युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागचा हेतू होता.
• अशा प्रकारच्या युवा संसदेमुळे युवकांच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन मिळते, त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होते आणि त्यांना या प्रक्रियेत राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी ते सक्षम होतात.