Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र 8 व्या स्थानी Maharashtra ranks 8th in National Education Survey

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • July 2025
  • राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र 8 व्या स्थानी Maharashtra ranks 8th in National Education Survey
Maharashtra ranks 8th in National Education Survey

● राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार ‘परख’ या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत 4 डिसेंबर 2024 रोजी देशपातळीवर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्र देशात 8 वा आला आहे.
● 2021 च्या तुलनेत ही वाढ तीन टक्क्यांनी अधिक आहे.
● सर्वेक्षणात इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांमधील संपादणूक क्षमता तपासण्यात आली.
● राज्यातील 4 हजार 314 शाळा, 13 हजार 930 शिक्षक आणि 1 लाख 23 हजार 659 विद्यार्थ्यांमधून हे सर्वेक्षण करण्यात आले.
● ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१’ व ‘परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४’ यांची तुलना करता इयत्ता ९ वी चा गणित विषय वगळता राज्याच्या सरासरी संपादणूकमध्ये ३ टक्के वाढ झाली आहे.
● इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीमधील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांमधील संपादणूक पडताळणी करण्यात आली.
● या सर्वेक्षणात राज्यातील ४ हजार ३१४ शाळा सहभागी झाल्या. यामध्ये शासकीय शाळांचे प्रमाण २९ टक्के, अनुदानित शाळांचे प्रमाण ३२ टक्के, खासगी शाळांचे प्रमाण ३३ टक्के आणि केंद्र सरकारच्या शाळांचे प्रमाण ७ टक्के होते.
● तसेच राज्यातील १३ हजार ९३० शिक्षकांसह १ लाख २३ हजार ६५९ विद्यार्थी सहभागी झाले.यामध्ये मुलींचे प्रमाण ४९ टक्के आणि मुलांचे प्रमाण ५१ टक्के होते.
● शहरी भागातील ५१ टक्के आणि ग्रामीण भागातील ४९ टक्के मुलांचा समावेश होता.
● विद्यार्थ्यांच्या केलेल्या मूल्यांकनामध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्राची सरासरी ही वरचढ आहे.

कोल्हापूर जिल्हा अव्वल

● सर्वेक्षणामध्ये कामगिरीनुसार जिल्ह्यांची संपादणूक तपासण्यात आली. यामध्ये तिसरी, सहावी व नववी या तिन्ही इयत्तांमध्ये कोल्हापूर संपादणुकीमध्ये सर्वोत्तम ठरले आहे.
● इयत्ता तिसरीमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, जळगाव यांची कामगिरी उत्तम आहे.
● तर लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर हे जिल्हे तुलनात्मदृष्ट्या कमी कामगिरी करणारे ठरले आहेत.
● ‘नॅक’ने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, परफॉर्मेन्स असेसमेंट, रिव्हीव्ह अँड अनालिसीस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टीक डेव्हलपमेंट (परख) अंतर्गत नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *