Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय हातमाग दिन

भालाफेक दिन
  • देशभरातील हातमाग विणकरांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कारागिरी साजरी करण्यासाठी भारतात दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो.
  • हातमाग क्षेत्राबद्दल आणि भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
  • नवी दिल्लीत विज्ञान भवन  येथे 7 ऑगस्ट 2024 रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे .
  • या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
  • या कार्यक्रमात , 5 संत कबीर पुरस्कार आणि 17 राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
  • उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार कॅटलॉग आणि कॉफी टेबल बुक- “परंपरा- भारताची शाश्वत हातमाग परंपरा” चे प्रकाशन केले जाईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, केंद्र सरकारने 7 ऑगस्ट 2015 रोजी अशा प्रकारचा पहिला उत्सव आयोजित करून राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करायला सुरुवात केली.
  • देशात 7 ऑगस्ट, 1905 रोजी स्वदेशी चळवळीचा आरंभ झाला म्हणून त्या तारखेचे औचित्य ठेवून 7 ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आली होती.
  • या माध्यमातून देशांतर्गत उद्योग आणि विशेषतः हातमाग विणकरांना प्रोत्साहन मिळते.
  • या माध्यमातून भारतातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि हातमाग क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न आहे.
  • हा दिवस देशातील हातमाग कामगारांचा सन्मान करण्याचा आणि देशाच्या सांस्कृतिक, पारंपारिक आणि आर्थिक पटलावर  त्यांच्या योगदानाचे कौतुक करून हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा आणि अभिमानाची भावना रुजवण्याचा प्रयत्न आहे.
  • हातमाग क्षेत्राचे महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक विकासातले त्याचे योगदान याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरात हा दिवस साजरा केला जातो.

7 ऑगस्ट : भालाफेक दिन

  • नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले, तो  7 ऑगस्टचा दिवस  भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या वतीने ‘भालाफेक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • 23 वर्षीय नीरज चोप्रा  वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा केवळ दुसरा भारतीय ठरला.
  • नीरजने त्यावेळी 58 मीटर्सचा सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती.
  • ‘पूर्ण देशभरात भालाफेकीचा प्रसार व्हावा, यासाठी 7 ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आला.
  • फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलयम काटोनिवेरे यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं.
  • फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ द ऑनर’ सुद्धा देण्यात आला.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत-फीजी संबध दृढ करण्यासंदर्भात फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटिव्हनी राबुका यांच्यासमवेत चर्चा केली.
  • फिजीची राजधानी सुवा येथे मुर्मु यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं.

स्वतःचाच विक्रम मोडीत डुफ्लान्टिसने पटकावले सुवर्णपदक

  • स्वीडनच्या आर्मांड डुप्लान्टिस याने विश्वविक्रमासह पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या पोल व्हॉल्ट सुवर्णपदक जिंकले.
  • सलग दुसरे ऑलिंपिक विजेतेपद मिळविताना 24 वर्षीय खेळाडूने 25 मीटरची नोंद केली.
  • डुप्लान्टिस याने 6 मीटर पार करून सलग दुसरे ऑलिंपिक सुवर्णपदक निश्चित केले, नंतरच्या प्रयत्नात त्याने 10 मीटरचा ऑलिंपिक विक्रम मोडीत काढला.
  • कामगिरीत आणखी प्रगती साधताना त्याने तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात एप्रिलमध्ये आपणच नोंदविलेला 24 मीटरचा विश्वविक्रम एका सेंटिमीटर फरकाने मोडला.
  • दोनवेळचा जागतिक विजेता असलेल्या ड्युप्लान्टिस याने नऊवेळा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • ऑलिंपिक पोल व्हॉल्टमध्ये अमेरिकेच्या बॉब रिचर्डस (1952 व 1956) याच्यानंतर विजेतेपद राखणारा डुप्लान्टिस पहिलाच अॅथलीट आहे.
  • या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या सॅम केन्ड्रिक्स (5.95 मीटर) याला रौप्यपदक, तर ग्रीसच्या इम्मानोईल कारालिस (5.90 मीटर) याला कांस्यपदक मिळाले.

 वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव

  • विशाळगडावरून शोधलेल्या कंदीलपुष्प वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीचे ‘सेरोपेजिया शिवरायीना’ असे नामकरण करण्यात आले आहे.
  • असे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति संशोधकांनी कृतज्ञता व्यक्त केली  आहे.
  • शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमच एका वनस्पतीच्या प्रजातीला -संबोधित केले जाणार आहे.
  • कोल्हापुरातील न्यू कॉलेज येथील अक्षय जंगम, रतन मोरे व डॉ. नीलेश पवार; तसेच चांदवड  नाशिक येथील डॉ. शरद कांबळे  आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा.  डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने या संदर्भातील शोधनिबंध सादर केला  आहे. तो न्यूझीलंड येथून प्रकाशित – होणाऱ्या फायटोटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला.
  • या नवीन प्रजातीला महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवत असताना स्वराज्य रक्षणात गडांचे त्याचबरोबर सभोवतालच्या जंगलांचे महत्त्व जाणले होते.
  • गड-किल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही संरक्षित क्षेत्रेच केली. एवढेच नव्हे; तर आज्ञापत्रात रयतेसाठी ‘गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी त्यामध्ये येक काठी तेही तोडू न द्यावी,’ असे आवाहन केले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *