मानवी हक्क दिन
- 10 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा मानवाधिकार दिन /मानवी हक्क दिन 2024 हा मूलभूत हक्क आणि सर्व व्यक्तींच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे.
- 1948 मध्ये या दिवशी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारण्यात आली.
मानवी हक्क दिनाची उत्पत्ती
- मानवी हक्क दिनाची उत्पत्ती दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात शोधली जाऊ शकते जेव्हा अशी युद्धे आणि अत्याचार पुन्हा होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी एलेनॉर रुझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमण्यात आली होती.
- यामुळे 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली गेली आणि अखेरीस संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ठरावाद्वारे 1950 मध्ये औपचारिकपणे स्थापना झाली.
- या दिवसाची औपचारिक स्थापना झाल्यापासून, दरवर्षी या दिवसाचा उद्देश मानवी हक्कांच्या महत्त्वाविषयी जागरुकता पसरवणे आणि जगभरातील भेदभाव आणि दडपशाही यांसारख्या चालू आव्हानांना तोंड देणे हे आहे.
मानवाधिकार दिन 2024 थीम:
- मानवाधिकार दिन 2024 ची थीम आहे “आमचे हक्क, आमचे भविष्य, आत्ता“.ही थीम मानवी हक्क शिक्षणाकडे तातडीने लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
- या वर्षी मानवी हक्कांचे परिणाम व्यावहारिक उदाहरणे आणि वाजवी उपायांद्वारे मांडण्याचे उद्दिष्ट आहे.
- गैरसमज मोडून काढणे आणि जागतिक मानवी हक्क चळवळींना बळकटी देणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा
- रिझर्व बँकेचे 26 वे गव्हर्नर म्हणून केंद्र सरकारने सनदी अधिकारी आणि केंद्रीय अर्थमंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली.
- भारतीय प्रशासकीय सेवेतील राजस्थान तुकडीचे 1990 सालचे अधिकारी असलेले 56 वर्षीय मल्होत्रा यांच्या गव्हर्नर पदी निवड मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंजुरी दिली.
- 11 डिसेंबर पासून 3 वर्ष असा त्यांचा कार्यकाळ असेल.
- अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून मल्होत्रा यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही प्रकारच्या करविषयक धोरणासंबंधी मुद्दे हाताळले आहेत.
- सनदी अधिकारी म्हणून तीन दशकांच्या कारकिर्दीत ते यापूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयात वित्तीय सेवा विभागाचे सचिव राहिले आहेत.
- तसेच ऊर्जा वित्त व कर प्रशासन माहिती तंत्रज्ञान आणि खाणी या मंत्रालयामध्ये कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे
- आयआयटी कानपूरमधून संगणक विज्ञानातून अभियांत्रिकी पदवी आणि अमेरिकेतील प्रिन्स्टन -विद्यापीठातून त्यांनी सार्वजनिक -धोरण या विषयातून पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.
- याआधी शक्तिकांत दास हे रिझर्व बँकेचे 25 वे गव्हर्नर म्हणून 12 डिसेंबर 2018 रोजी पदभार स्वीकारला होता त्यांना 2021 मध्ये मुदतवाढ मिळाली होती.
भारतीय रिझर्व बँक
- ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.
- सर्वप्रथम 1771 मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती.
- ,1926च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी 1 जानेवारी 1927 मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली, परंतु ती केवळ सात वर्षांनंतर मार्च 1934 मध्ये ही अधिनियमित करण्यात बनली.
- 1 एप्रिल इ.स. 1935 रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 नुसार झाली.
- राष्ट्रीयकरण – 1 जानेवारी 1949
- सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी 1 एप्रिल 1935 रोजी आपला कार्यभार स्वीकारला.
- सी.डी.देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर
- मुख्यालय : मुंबई