● आंतरराष्ट्रीय स्तरावर २३ वर्षांखालील गटातील भारताची पहिली महिला जगज्जेती कुस्तीपटू रितिका हुडा उत्तेजक चाचणीत दोषी आढळली असून, राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) तिला चार वर्षांसाठी निलंबित केले आहे.
● ऑलिम्पिकच्या ७६ किलो वजनी गटासाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला कुस्तीपटूही रितिकाच आहे.
● या वर्षी तीन स्पर्धांत मिळून रितिका केवळ एकच लढत हरली आहे.
● आशियाई अजिंक्यपद निवड चाचणीदरम्यान 15 मार्च रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत तिच्या लघवीच्या नमुन्यात एस १.१ हे अँडोजेनिक स्टेरॉइड सापडले.