● रेल्वे प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘रेलवन’ ॲपला सुरुवात करण्यात आली.
● केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या ॲपचे उद्घाटन करण्यात आले आहे.
● ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’च्या (सीआरआयएस) चाळिसाव्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत ‘रेलवन’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले आहे.
● ‘अँड्रॉइड’ तसेच ‘आयओएस ॲप स्टोअर’वरून ते डाउनलोड करता येईन.
● प्रवासादरम्यान ऑनलाइन जेवण मागवायचे असेल तर ती सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
● याशिवाय तक्रारींचा निपटारा, फीडबॅक सिस्टिम, आपत्कालीन मदत ही सेवा त्यात असेन.
● मालगाड्यांची माहिती, माल बुकिंग आणि ट्रॅकिंगची माहिती लोकांना घेता येणार आहे.
● गाडीचा क्रमांक ,गाडी नेमकी कोठे,जागांची उपलब्धता,स्टेशन अलर्ट, गाड्यांचे वेळापत्रक दिसेल.



