● रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे.
● विश्वनाथन आनंदने भारताचा पहिला ग्रँडमास्टर होण्याचा मान 1988 मध्ये मिळवला होता, तर वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दिव्या देशमुख देशातील 88 वी ग्रँडमास्टर झाली होती. रोहितने अल्माटी मास्टर्स कोएनेव कप स्पर्धेत ही कामगिरी केली.
● रोहितने रुमानियाच्या आर्तर देवत्यान याला स्पर्धेतील अखेरच्या फेरीत पराभूत करून ग्रँडमास्टर किताब निश्चित केला.
● त्याने या स्पर्धेत नऊ फेऱ्यांमध्ये सहा गुण मिळवून ग्रँडमास्टर किताबासाठीचा तिसरा आणि अंतिम नॉर्म मिळवला.