‘लखपती दीदी‘ योजना
- महिलांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास प्रोत्साहन देणारी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ‘लखपती दीदी’ ही केंद्र सरकारची एक अभिनव योजना आहे.
- जळगाव येथे रविवारी (२५ ऑगस्ट) लखपती दीदी संमेलन झाले.
- त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत एक कोटी महिला लखपती दीदी झाल्याचे सांगून गेल्या दोन महिन्यांत एकूण 11 लाख महिलांनी हे लक्ष्य साध्य केल्याची माहिती दिली.
- एकूण 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट केंद्राने निश्चित केले आहे.
- पंतप्रधानांनी संमेलनापूर्वी निवडक 80 लखपती दीदींशी संवाद साधला.
- ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली.
- या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते.
योजनेची उद्दिष्ट्ये:
- उमेद- अर्थातच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामविकास व पंचायतराज विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे.
- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे, त्यांना आत्मनिर्भर करून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मदतीचा हात देणारे, त्यांच्यात नवा विश्वास निर्माण करून नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याचे बळ देणारे, ग्रामीण महिलांच्या हक्काचे हे व्यासपीठ आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
- हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून महाराष्ट्रात 25 लाख लखपती दीदी तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले असून ते आता पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे.
- लखपती दीदींचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपयांपेक्षा पुढे जावे यासाठी त्यांना दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यवसाय संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत.
योजनेचे स्वरूप:
- या योजनेअंतर्गत अभियानातील महिलांना बँकेचे व्यवहार शिकवले जातात.
- त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर केले जाते कृषी विषयक माहितीसाठी अभियानात कृषी सखी आहेत.
- बँक विषयक मदतीसाठी बँक सखी आहेत.
- अशा विविध क्षेत्रात प्रशिक्षित असलेल्या व्यक्ती अभियानात आहेत.
- तसेच मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- उमेद अभियानात 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 8974 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे आले असून आजपर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात मोठे कर्ज म्हणून देखील गणले गेले आहे.
योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?
- या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा.
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी.
- महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे
- या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
‘एमडीपीएच‘ ला निर्यातीसाठी पुरस्कार
- हस्तकला निर्यात प्रोत्साहन महामंडळातर्फे (ईपीसीएच) देण्यात येणारा हस्तकलेच्या वस्तू निर्यातीसाठीचा पुरस्कार अगरबत्ती उत्पादन क्षेत्रातील अग्रेसर कंपनी म्हैसूर डीप परफ्युमरी हाउसला (एमडीपीएच) प्राप्त झाला आहे.
- नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- हा पुरस्कार प्राप्त करणारी एमडीपीएच ही मध्य भारतातील पहिली कंपनी आहे.
- एमडीपीएच चे संचालक अंकित अग्रवाल यांनी हा पुरस्कार स्वीकारला
चितळे बंधूचा सचिन ब्रँड अॅम्बेसिडर
- ‘चितळे बंधू मिठाईवाले’ 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने ‘क्रिकेटचा देव’ अशी ओळख असलेले सचिन तेंडुलकर आता ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचे सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) असतील, अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे आणि इंद्रनील चितळे यांनी केली.
- “सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ‘सदिच्छादूत’ झाल्याचे औचित्य साधत क्रिकेटच्या या आयकॉनिक ब्रँडसोबत नमकीन व भुकेच्या वेळेत खाता येण्यासारख्या (स्नॅक्स) पदार्थांची नवीन श्रेणी ग्राहकांसाठी सादर करणार आहेत.
- 1950 मध्ये चितळे बंधू मिठाईआले ची स्थापना रघुनाथ चितळे यांनी केली होती
एकीकृत पेन्शन योजना
- केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजनेला (यूपीएस – युनिफाईड पेमेंट स्किम) मंजुरी दिली.
- ही योजना राज्य कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्राने लागू केली आहे.
- महाराष्ट्र हे यूपीएस लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे.
- ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.
नेमकी योजना काय?
- निवृत्तीवेतन भांडवल बाजाराशी पूर्णतः संलग्न न ठेवता काही प्रमाणात स्थिर व नियमित उत्पन्न देणारी अशी ही योजना आहे.
- या योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्याची एकूण सेवा लक्षात घेऊन त्याला निवृत्तीनंतर नियमित स्वरूपाची आणि आधी निश्चित केलेली रक्कम दिली जाईल
पेन्शन कसे मोजणार?
- एखाद्या कर्मचाऱ्याची सरकारी नोकरी सलग 25 वर्षे झाली असेल तर त्याला शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात मिळेल.
- पेन्शनची ही रक्कम महागाई भत्यातून चालनवाढीशी संलग्न राहील.
- यूपीएस मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान पूर्वीप्रमाणेच राहील.
- केंद्र सरकार मात्र या योजनेमध्ये पूर्वीच्या 14 टक्यांऐवजी 5 टक्के योगदान देईल.
एनपीएस आणि यूपीएस संबंध काय ?
- नव्या पेन्शन योजनेअंतर्गत (एनपीएस) निवृत्त झालेल्यांना व नियत सेवावधी लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना यूपीएसच्या तरतुदी लागू केल्या जातील.
- या योजनेत थकबाकीची रक्कम पीपीएफच्या व्याजदरानुसार व्याजासह देण्यात येईल.
- एकदा एखाद्या कर्मचाऱ्याने यूपीएस योजना निवडल्यानंतर त्याला एनपीएसकडे जाता येणार नाही.
‘आयएनएस मुंबई‘ श्रीलंकेत
- श्रीलंकन नौदल जहाजांबरोबरच्या सरावासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका ‘आयएनएस मुंबई’ तीन दिवसीय दौऱ्यासाठी कोलंबो बंदरात दाखल झाली.
- भारतीय नौदलाच्या या आघाडीच्या युद्धनौकेचे श्रीलंकेच्या नौदलाने परंपरेप्रमाणे स्वागत केले.
- 163 मीटर लांबीची ‘आयएनएस मुंबई’ 410 सदस्यांद्वारे चालवली जाते.
- ही युद्धनौका श्रीलंकेच्या नौदलासोबत क्रीडा स्पर्धा, योगासने आणि समुद्रकिनाऱ्याची साफसफाई यासारखे संयुक्त उपक्रमही हाती घेईल.
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन
- नांदेडचे काँग्रेस पक्षाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे 70 व्या वर्षी निधन झाले.
- हैदराबादच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
- मागील दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
- यकृतामध्ये संसर्ग झाल्यामुळे चव्हाण यांना सुरवातीला नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. तसेच, कमी रक्तदाबाचा त्रासही होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर चव्हाण यांना 13 ऑगस्टला एअर अॅम्ब्युलन्सने उपचारासाठी हैदराबादला नेण्यात आले.
- लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर नांदेडमधील निवडणूक चर्चेत आली होती.
- काँग्रेसचा गड असलेल्या नांदेड मतदारसंघात 2004 च्या निवडणुकीत भाजपने शिरकाव केलेला होता.
- मात्र काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी भाजपचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत विजय खेचून आणला होता.
- 59 हजार 442 मतांनी चव्हाणांनी चिखलीकरांवर मात केली. वसंतराव चव्हाण यांना 5,28,894 तर चिखलीकरांना 4,69,452 मतं मिळाली होती.
वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवला
- वसंत चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अगदी सरपंचपदापासून केलेली आहे.
- वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव चव्हाण हेदेखील नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ होते.
- आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत वसंत चव्हाण यांनी सरपंच ते खासदार अशी वेगवेगळी पदे भूषवली. वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव हेदेखील आमदार होते.
सरपंच ते खासदार
- नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.
- त्यानंतर वसंतराव चव्हाण या मतदारसंघाचे पहिले आमदार ठरले.
- वसंतराव चव्हाण हे सर्वप्रथम 1978साली आपल्या नायगाव या गावाचे सरपंच झाले.
- त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढाच राहिला. काही काळानंतर ते जिल्हा परिषदेवर गेले.
- 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.
- त्यांचे राजकीय वजन ओळखून काँग्रेसने त्यांना लगेच विधानपरिषदेची आमदारकी दिली. त्यानंतर त्यांनी 16 वर्षे विधानपरिषद आणि विधानसभेत आमदारकी भूषवली.
एरिक्सन यांचे निधन
- इंग्लंड फुटबॉल संघाचे पहिले परदेशी प्रशिक्षक, तसेच इटली, पोर्तुगाल आणि स्वीडनमध्ये क्लब संघांना मार्गदर्शन करताना यशस्वी कामगिरी करणारे स्वेन-गोरान एरिक्सन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले
- एरिक्सन यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्याला स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे सांगितले.
- त्यांच्या सर्वांत आवडत्या लिव्हरपूल क्लबने त्यांना एका विशेष सामन्यात प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी दिली होती.
- मायदेशात (स्वीडन) ‘स्वेनीस’ या नावाने प्रचलित असलेल्या एरिक्सन यांना वयाच्या 27व्या वर्षीच फुटबॉल खेळण्यातून निवृत्ती घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली.
- 2001 मध्ये त्यांची इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- त्यांना इंग्लंडची ‘सुवर्ण पिढी’ मानल्या जाणाऱ्या डेव्हिड बेकहॅम, वेन रूनी, फ्रँक लॅम्पार्ड, स्टीव्हन जेरार्ड यांसारख्या नामांकित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची संधी लाभली.
- एरिक्सन यांच्या मार्गदर्शनाखालील 2002 आणि 2006 या वर्षी इंग्लडला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते.
क्लब स्तरावर यश…
- आंतरराष्ट्रीय स्तरावर एरिक्सन यांना कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. मात्र, क्लब फुटबॉलमध्ये त्यांना यश मिळाले.
- एरिक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली आयएफके गॉथनबर्ग क्लबने 1982 मध्ये स्वीडनमधील लीग आणि युएफा चषकाचे जेतेपद पटकावले होते.
- बेन्फिका क्लबचे प्रशिक्षकपद भूषवताना त्यांनी तीन वेळा पोर्तुगालमधील लीग जिंकली.
- त्यांनी इटलीतील रोमा आणि सॅम्पदोरिया संघांना एकेकदा कोपा इटालियाचे जेतेपद मिळवून दिले. तसेच लॅझिओने ‘सेरी ए’, कोपा इटालिया (दोन वेळा), सुपरकोपा इटालियाना (दोन वेळा), युएफा सुपर चषक अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकल्या.