Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली.

अधिक माहिती
• माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांच्यानंतर अडवानी हे भारतरत्न मिळविणारे भारतीय जनता पक्षाचे तिसरे नेते आहेत.
● भारतरत्न पुरस्काराचे अडवाणी हे 50 वे मानकरी ठरले आहेत.
● स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी, शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण, आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 मध्ये सर्वप्रथम सन्मानित करण्यात आले होते.
● नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत गेल्या दहा वर्षात प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंडित मदन मोहन मालवीय,कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी ( 7 व्यक्तींना) यांना भारतरत्नने सन्मानित केले आहे.

लालकृष्ण अडवाणी
● जन्म: 8 नोव्हें. 1927, कराची
● वडिलांचे नाव: किशनचंद डी. अडवाणी
● आईचे नाव: ग्यानी अडवाणी
● कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले.
● फाळणीनंतर भारतात आल्यावर त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली.
● डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सन 1951 मध्ये जनसंघाची स्थापना केली, तेव्हा अडवानी 1957 पर्यंत या पक्षाचे सचिव होते.
● त्यानंतर 1973 ते 1977 या काळात त्यांनी जनसंघाचे अध्यक्षपदही भूषवले.
● सन 1980 मध्ये मुंबईत भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अडवानी हे या पक्षाचे संस्थापक सदस्य होते.
● 1980 ते 1986 पर्यंत भाजपचे सरचिटणीस व 1986 ते 1991 पर्यंत अडवानी भाजपचे अध्यक्ष होते.
● अडवानी यांनी तीन वेळा भाजपचे अध्यक्षपद, पाच वेळा लोकसभेचे आणि चार वेळा राज्यसभेचे खासदारपद भूषविले.
● ‘संसदेतील सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते’ असाही विक्रम त्यांच्या नावावर आहे.
● जनता पक्षाच्या सरकारमध्ये 1977 ते 1979 या काळात ते पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले.
● या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला.
● त्यानंतर 1996 ते 2004 या काळातील वाजपेयी यांच्या तिन्ही सरकारांमध्ये गृहमंत्री राहिलेल्या अडवानींची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली.
● 2002 ते 2004 या काळात त्यांनी वे देशाचे उपपंतप्रधानपदही भूषविले.
● भाजपने त्यांच्याच नेतृत्वाखाली 2004 व 2009 ची लोकसभा निवडणूक लढविली.
● 2019 पर्यंत ते खासदार होते.
● 2015 या वर्षी अडवाणी यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *