भारताचे महान टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे ते आशिया खंडातील पहिलेच टेनिसपटू ठरले आहेत. या दोघांसह लेखक रिचर्ड इव्हान्स यांचीही निवड करण्यात आली आहे.
• याआधी 264 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते.
• या यादीत समावेश होणारा भारत 28 वा देश ठरला.