वज्र प्रहार सराव – 2024
- भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्य दलाच्या वज्र प्रहार सरावाच्या 15 व्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल आज रवाना झाले.
- हा सराव 2 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान अमेरिकेतील इदाहो मधील ऑर्चर्ड कॉम्बॅट ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित केला जाणार आहे.
- याच सरावाची यापूर्वीची आवृत्ती डिसेंबर 2023 मध्ये मेघालयातील उमरोई येथे आयोजित करण्यात आली होती.
- भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्यादरम्यानचा हा या वर्षातील दुसरा सराव असेल.