- ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यावर्षीचा दादासाहेब फाळक जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला .
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
- चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
- प्यासा, साहब बिवी और गुलाम, गाईड, कागज के फूल, चौदहवी का चांद यासारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये चतुरस्त्र अभिनयाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके सन्मान जाहीर करण्यात आला.
- हा 2021 या वर्षीच्या पुरस्कार आहे.
- 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रेहमान यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे .
- वहिदा रेहमान यांनी गुरुदत्त यांच्या सीआयडी चित्रपटांमधून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
- ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता चिरंजीवी, परेश रावल, चॅटर्जी व शेखर कपूर यांच्या निवड समितीने वहिदा रहमान यांची पुरस्कारासाठी निवड केली
वहिदा यांचा परिचय:-
जन्म: 3 फेब्रुवारी 1938 चेन्नई
पहिला चित्रपट: रोजूलू मरायी आणि जयसिंहा (तेलुगु 1955)
पहिला हिंदी चित्रपट:- सीआयडी (1956)
पुरस्कार :
पद्मश्री (1972)
पद्मभूषण (2011)
राष्ट्रीय पुरस्कार (रेश्मा और शेरा -1971)
फिल्मफेअर (गाईड- 1965, निल कलम -1968)
याआधीचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला होता.
दादासाहेब फाळके पुरस्कार:
- दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.
- इ.स. 1969 मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे.
- हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे दिला जातो.
- दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.


