महाराष्ट्रात वर्षभरात एकूण 48 वाघांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 कालावधीत राज्यात ४८ वाघांचा मृत्यू झाला. त्यापैकी 26 वाघांचा नैसर्गिक, प्रत्येकी दोघांचा विष आणि शिकारीमुळे, 9 जणांचा अपघाताने आणि 9 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 23 वाघांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशात 41 तर उत्तराखंडमध्ये 23 वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वाघांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष वाढलेला असल्याने वाघांना अनेकदा विषप्रयोगाला समोर जावे लागत आहे. त्यामुळेही मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.
याशिवाय विविध अपघात, विजेचा धक्का या प्रमुख कारणामुळेही मृत्यू होऊ लागले आहेत.
2023 या वर्षी सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद झालेली राज्य
1) महाराष्ट्र – 48
2) मध्य प्रदेश – 41
3) उत्तराखंड – 23
4) कर्नाटक – 21