पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘विकसित भारत@2047 व्हाईस ऑफ युथ’ या महत्वाकांक्षी योजनेची सुरवात करण्यात आली. दुरदृष्य प्रणालीने पंतप्रधान विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच विविध संस्थांच्या प्रमुखांना मार्गदर्शन केले. या योजनेच्या निमित्ताने युवाशक्तीला विविध राष्ट्रीय योजनांच्या निर्मितीत सहभागी करून घेणे तसेच देशाच्या प्रगतीसाठी विविध उद्दिष्टे त्यांना विशद केली जातील.
अधिक माहिती
● देशाच्या राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे यांच्या निर्मितीमध्ये देशातील तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार,‘विकसित भारत @2047: तरुणाईचा आवाज ’ हा उपक्रम देशातील तरुणांना विकसित भारत @2047 च्या दृष्टिकोनामध्ये विचारांचे योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
● विकसित भारत @2047 साठी युवकांना त्यांच्या कल्पना आणि सूचना सामायिक करण्यासाठी कार्यरत ठेवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.
● विकसित भारत @2047 हा स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा दृष्टीकोन आहे.
● या दृष्टीकोनामध्ये आर्थिक वृद्धी सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन यासह विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे.