केंद्र सरकारने निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरविंद पानगढिया यांची 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आता, ज्येष्ठ पत्रकार आणि 1 ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष, माजी व्यय सचिव अजय नारायण झा, निवृत्त सनदी अधिकारी अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष या चार नवीन सदस्यांची नियुक्तीची घोषणा केली.
डॉ. राजाध्यक्ष मराठी मातीतून चौथे प्रतिनिधित्व
• 16 व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक आणि मिंट या अर्थविषयक दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक डॉ. निरंजन राजाध्यक्ष हे आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे चौथे मराठी अर्थतज्ज्ञ ठरले आहेत.
• यापूर्वी धनंजय गाडगीळ आणि विजय केळकर यांनी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, तर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही वित्त आयोगात जबाबदारी निभावली होती.