विदर्भला तिसऱ्यांदा रणजी विजेतेपद
- सातत्यपूर्ण कामगिरीची मालिका अंतिम फेरीतही कायम राखून विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- घरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम फेरीत विदर्भाने केरळवर पहिल्या डावातील आघाडीवर सरशी साधली.
- विदर्भाने याआधी 2017-18; तसेच 2018-19 असे सलग दोन वेळा रणजी जेतेपद पटकावले होते.
- विदर्भाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केरळवर 37 धावांची आघाडी घेऊन जेतेपद जवळपास निश्चित न केले होते.
- प्रथमच रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत धडक केरळलने कडवी झुंज दिली.
- सामनावीर – दानिश मालेवार(153 आणि 73 धावा)
- स्पर्धेचा मानकरी – हर्ष दुबे,विदर्भ (476 धावा,69 विकेट)