● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 22 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सरी येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या लोह प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत.
● हा प्रकल्प विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ठरणार आहे.
● 22 जुलैलाच हेडरी येथे उभारण्यात आलेल्या पाच मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांटचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
● यासह 10 मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्लरी पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटनही होणार आहे.
● ही पाइपलाइन महाराष्ट्रातील पहिली कार्यरत लोखंड स्लरी पाइपलाइन ठरणार आहे.
● हेडरी ते कोन्सारी अशी 85 किमी लांबीची पॅलेट प्लांट दरम्यान असलेली ही पाइपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची आहे.