Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड

आयएनएस तुशील

  • आयएनएस तुशील (F 70), अत्याधुनिक बहु उद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका, 9 डिसेंबर 2024 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील यंतर शिपयार्डमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात सामील करण्यात आली.
  • या युद्धनौकेचे नौदलात सामील होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचा गौरवास्पद दाखला आहे.
  • ही युद्धनौका, भारत आणि रशिया यांच्यातील  जी सामायिक मूल्ये, परस्पर विश्वास तसेच विशेष आणि धोरणात्मक विशेषाधिकार असलेल्या भागीदारीच्या दीर्घकालीन मैत्री संबंधातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे
  • आयएनएस तुशील ही प्रोजेक्ट  6 ची क्रिवाक III श्रेणीची  अपग्रेड केलेली युद्धनौका  आहे.
  • आयएनएस तुशील युद्धनौकेसाठी  जेएससी रोसोबोरॉनएक्स्पोर्ट , भारतीय नौदल आणि भारत सरकार यांच्यात ऑक्टोबर 2016 मध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
  • मॉस्को येथील भारतीय दूतावासाच्या अधिपत्याखाली कॅलिनिनग्राड येथे तैनात असलेल्या युद्धनौका पर्यवेक्षण पथकातील तज्ज्ञांच्या  भारतीय पथकाने जहाजाच्या बांधकामाचे बारकाईने निरीक्षण केले.
  • ही युद्धनौका अनेक रशियन आणि भारतीय मूळ उपकरण निर्मात्यांबरोबरच शेकडो शिपयार्ड कामगारांच्या सातत्यपूर्ण  मेहनतीचा परिणाम आहे. जहाज बांधणी पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या जानेवारीपासून या युद्धनौकेच्या  मोठ्या प्रमाणावर चाचण्या झाल्या, ज्यामध्ये फॅक्टरी सी ट्रायल, स्टेट कमिटी ट्रायल,आणि शेवटी भारतीय तज्ज्ञांच्या  टीमद्वारे डिलिव्हरी ऍक्सेप्टन्स ट्रायल यांचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये शस्त्रास्त्रांच्या गोळीबारासह जहाजावरील सर्व रशियन उपकरणे सिद्ध करणे समाविष्ट होते. चाचण्यांदरम्यान, जहाजाने 30 नॉट्सपेक्षा अधिक प्रभावी वेग पकडला. या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे,  जवळपास युद्धासाठी सज्ज असून लवकरच भारतात पोहोचेल.
  • जहाजाचे नाव, तुशील, याचा अर्थ ‘संरक्षक कवच’ आणि त्याचे बोधचिन्ह ‘अभेद्य कवचम’ (अभेद्य ढाल) चे प्रतीक आहे.
  • ‘निर्भय, अभेद्य आणि बलशील’ (निर्भय, अदम्य, दृढनिश्चय) या आपल्या ब्रीदवाक्यासोबत हे जहाज  देशाच्या सागरी सीमांचे रक्षण आणि सुरक्षा करण्याच्या भारतीय नौदलाच्या अखंड वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
  • हे 125 मीटर लांबीचे  3900 टन वजनाचे जहाज रशियन आणि भारतीय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनौका बांधणीतील सर्वोत्तम पद्धतींचे प्रभावी मिश्रण आहे.
  • जहाजाच्या नवीन डिझाईनमध्ये  वर्धित स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि उत्तम  स्थिरता वैशिष्ट्ये  आहेत.
  • भारतीय नौदल विशेषज्ञ आणि सेव्हर्नॉय डिझाईन ब्युरो यांच्या सहकार्याने, जहाजातील स्वदेशी घटकांचे प्रमाण  26% पर्यंत वाढविण्यात आले असून मेड-इन-इंडिया सिस्टीमची संख्या दुपटीने वाढून 33 इतके झाले  आहे.
  • ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, केल्ट्रॉन, टाटाचे  नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम्स, एल्कॉम मरीन, जॉन्सन कंट्रोल्स इंडिया आणि इतर अनेक प्रमुख भारतीय ओईएम  यांचा यात समावेश होता.
  • नौदलात समाविष्ट  झाल्यावर, आयएनएस  तुशील भारतीय नौदलाच्या ‘स्वोर्ड आर्म’  या पश्चिमी नौदल  कमांडच्या अंतर्गत, वेस्टर्न फ्लीट मध्ये सामील होईल,आणि जगातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौकेपैकी एक गणले जाईल. हे केवळ भारतीय नौदलाच्या वाढत्या क्षमतेचेच नव्हे तर भारत-रशिया भागीदारीच्या लवचिक सहकार्यात्मक सामर्थ्याचे प्रतीक असेल.

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड

  • विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोधपणे निवड झाली आहे.
  • नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केली.

भारदे यांच्यानंतर दुसऱ्यांदा अध्यक्षपद

  • विधानसभेच्या अध्यक्षपदी लागोपाठ दुसऱ्यांदा निवड होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत.
  • यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे 17 मार्च 1962 ते 13 मार्च 1967 आणि 15 मार्च 1967 ते 15 मार्च 1972 या कालावधीत 9 वर्षे 362 दिवस असे दोन वेळा विधानसभेचे अध्यक्ष भूषविले होते.
  • नार्वेकर यांनी पहिल्यांदा अडीच वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे.

राहुल नार्वेकरांचा अल्पपरिचय:

  • राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली.
  • राहुल नार्वेकरांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
  • 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
  • यानंतर आता झालेल्या 2024 च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते विजयी झाले.
  • राहुल नार्वेकर हे 2022 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे एकाचवेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते.
  • सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *