अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रति वर्ष दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. गेल्या वर्षीपासून राज्य शासन विश्व मराठी संमेलन आयोजित करत असून 27 ते 29 जानेवारी दरम्यान मुंबई परिसरात होणाऱ्या विश्व मराठी संमेलन 2024 साठी 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
अधिक माहिती
● जणांसाठी जागतिक मराठी अकादमी 2004 पासून जागतिक मराठी संमेलन भरवते.
● संमेलनाची रूपरेखा आणि आयोजन याची जबाबदारी मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त राज्य मराठी विकास संस्थेवर आहे.
● मराठी भाषेची स्थिती महाराष्ट्रातील बोली या विषयावरच्या साहित्याचे प्रकाशन या संमेलनात होणार आहे.
● परदेशस्थ मराठी लेखकांची अनुभव कथन तसेच मराठीतून शिकलेल्या जगभरातील नामवंत मंडळींच्या मुलाखती संमेलनात होणार आहेत.
● परदेशी विद्यापीठांतील मराठीच्या शिक्षणाची वर्तमान स्थिती आणि अन्य भाषकांना मराठी शिकताना येणाऱ्या अडचणी यावरचे रोचक मार्ग यावर संमेलनात परिसंवाद ठेवण्यात आला आहे.
● ज्ञानभाषा व तंत्र भाषा या पद्धतीने मराठीचा विकास कसा करता येईल यावर विचारमंथन होईल.


