Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

व्याघ्र संवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन Tiger conservationist Valmik Thapar passes away

  • Home
  • June 2025
  • व्याघ्र संवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन Tiger conservationist Valmik Thapar passes away
Tiger conservationist Valmik Thapar passes away

● भारतीय व्याघ्र संवर्धनवादी आणि इतिहास लेखक वाल्मिक थापर यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.
● वाल्मिक थापर यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळासह अनेक उच्च सरकारी संस्थांमध्ये काम केले.
● जवळजवळ पाच दशकांहून अधिक काळ, थापर हे भारताच्या व्याघ्र संवर्धन प्रयत्नात सहभागी होते.
● वन्यजीव संवर्धनावर दोन डझनहून अधिक पुस्तकांचे लेखक वाल्मीक थापर यांनी अनेक ऐतिहासिक वन्यजीव माहितीपटांची निर्मिती केली आहे. ज्यात “लँड ऑफ द टायगर” (1997) यांचा समावेश आहे.
● थापर यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळासह सरकारच्या अनेक उच्चपदस्थ संस्थांमध्ये काम केले.
● राजस्थानमधील सारिस्का येथे वाघांचे अस्तित्व संपल्यानंतर या अभयारण्यात सुधारणा सुचवण्यासाठी स्थापन केलेल्या ‘टायगर टास्क फोर्स’चे ते सदस्य होते.
● 1987 मध्ये थापर यांनी रणथंभोर फाउंडेशनची स्थापना केली.
● या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक समुदायांना व्याघ्रसंवर्धनासाठी एकत्र आणले.
● विस्थापित ग्रामस्थांसाठी उपजीविकांचे साधन निर्माण केले.
● पाच दशकांहून अधिक काळापासून थापर हे व्याघ्रसंवर्धनात कार्यरत होते.
● वन्यजीव आणि संवर्धनावर त्यांनी सुमारे 32 पुस्तके लिहिली.
● ‘द लास्ट टायगर’, ‘लिव्हिंग विथ टायगर्स’ आणि ‘द सिक्रेट लाइफ ऑफ टायगर्स’ ही दोन पुस्तके विशेष प्रसिद्ध होती.
● त्यांनी अनेक ऐतिहासिक वन्यजीव माहितीपटांची निर्मिती केली.
● 16 आंतरराष्ट्रीय माहितीपटांचा त्यात समावेश आहे. यात ‘लँड ऑफ द टायगर’ या मालिकेचाही समावेश आहे.
● 2017 मध्ये, सॅन्चुअरी नेचर फाउंडेशनने त्यांना जीवनगौरव सेवा पुरस्कार प्रदान केला.
● प्रसिद्ध पत्रकार रोमेश थापर हे त्यांचे वडील होते.
● दिवंगत अभिनेता शशी कपूर यांची मुलगी व रंगभूमी कलावंत संजना कपूरशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा 1952 मध्ये दिल्ली येथे झाला

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *