● केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस.(वेलिक्काकाथु शंकरन) अच्युतानंदन (वय १०१ वर्षे) यांचे निधन झाले.
● हृदयविकाराच्या झटक्यानंतर अच्युतानंदन यांच्यावर 23 जूनपासून येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अल्प परिचय:
● अलाप्पुझा जिल्ह्यातील पुन्नाप्रा या किनारपट्टीवरील गावात 20 ऑक्टोबर 1923 रोजी जन्मलेल्या अच्युतानंदन यांचे सुरुवातीचे आयुष्य खडतर आणि गरिबीने भरलेले होते.
● त्यांनी मजुरीही केली.
● १९४० च्या दशकात प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते पी. कृष्णा पिल्लई यांच्याप्रेरणेने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
● 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्षातून फुटून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणाऱ्या ३२ सदस्यांपैकी ते एक होते.
● मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले अच्युतानंदन हे कामगारांचे हक्क, जमीन सुधारणा आणि सामाजिक न्यायाचे आजीवन पुरस्कर्ते होते.
● त्यांनी 2006 ते 2011 या काळात केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि तीन वेळा विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.
● ते सात वेळा आमदार होते.