● कबड्डीच्या उत्कर्षासाठी संपूर्ण आयुष्य झगडणाऱ्या ज्येष्ठ कबड्डीपटू आणि संघटक शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने श्री शिवछत्रपती राज्य
क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
● क्रीडाक्षेत्रात राज्याचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची (2023-24) घोषणा क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी मंत्रालयात केली.
● गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंना पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात येत होते. या वेळी मात्र सात क्रिकेटपटूंना थेट पुरस्कार मिळणार आहे.
● यावर्षी 88 पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यामध्ये 50 पुरुष, तर 38 महिलांचा समावेश आहे.
● आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या राज्यातील 20 खेळाडूंना थेट पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
● जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख, शिवछत्रपती पुरस्कारासाठी तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सात क्रीकेटपट्टूचा समावेश
● शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या यादीत क्रिकेटपटूंवर वर्षाव करण्यात आला आहे.
● पुरुष विभागात राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, जितेश शर्मा, यशस्वी जयस्वाल व महिला विभागात जेमिमा रॉड्रिग्ज व राधिका वैद्य यांचा थेट
राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
प्रथमच महिला खेळाडूचा सन्मान
● 2001 शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली.
● पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
● 1979 ते 1982 कालावधीत 106 राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता.
● खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल आठ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे.
● महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत.
●1978 मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.



