Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शक्तीकांत दास पंतप्रधानांचे मुख्य सचिव

 शक्तीकांत दास पंतप्रधानांचे मुख्य सचिव

 

  • रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर शक्तिकांत पंतप्रधानांचे ‘मुख्य सचिव-2’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळासोबत दास यांचाही कार्यकाळ संपेल. विद्यमान मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांच्यासमवेत दास हे काम करतील.
  • शक्तिकांत दास यांनी डिसेंबर-2018मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यभार हाती घेतला होता.
  • सहा वर्षांच्या सेवेनंतर डिसेंबर-2024मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने दास यांची पंतप्रधानांचे ‘मुख्य सचिव-2’ म्हणून नेमणूक केली आहे.
  • मूळचे ओडिशाचे असलेले दास हे 1980 च्या तमिळनाडू बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *