गझलेद्वारे, त्यातील एकेका शेरद्वारे आईविषयी सखोल भावना व्यक्त करणारे, शायरीतून जगण्यातील विरोधाभास टिपतानाच, प्रेमाचे बहुविध अंतरंग उलगडून दाखविणारे प्रख्यात शायर-गझलकार मुनव्वर राणा यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. राणा काही वर्षांपासून घशाच्या कर्करोगाशी झुंज देत होते.
अल्पचरित्र…
● मुनव्वर राणा यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1952 रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे झाला.
● त्यांच्या वडिलांचे नाव अन्वर राणा, तर आईचे नाव आयशा खातून.
● वयाच्या 13 व्या वर्षापासून ते शायरी करू लागले. त्यांनी पहिला शेर आईवरच लिहिला. आईविषयी त्यांच्या मनात कमालीचे ममत्व होते. ते अनेकदा जाहीर व्यक्तही झाले होते.
● राणा यांनी अनेक मुशायरे गाजविले. मुनव्वर राणा आणि राहत इंदौरी ही जोडगोळी अनेक मुशायन्यांच खास आकर्षण असे.
● ‘शहदाबा’ या गझलसंग्रहाकरिता त्यांना सन 2014 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मात्र पुढच्याच वर्षी त्यांनी देशात असहिष्णुता वाढत असल्याच्या कारणावरून हा पुरस्कार परत केला.
● भविष्यात कोणताही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
● राणा यांच्या पुस्तकांचे इंग्रजी, बांगला व अन्य भाषांत अनुवाद झाले आहेत.
मुनव्वर राणांचे गाजलेले शेर
● ‘इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है, माँ बहुत गुस्से में होती है तो रो देती है।’
● ज़रा-सी बात है लेकिन हवा को कौन समझाये, दिये से मेरी माँ मेरे लिए काजल बनाती है।
● ‘चलती फिरती हुई आँखों से अज़ाँ देखी है, मैं ने जन्नत तो नहीं देखी है माँ देखी है।’
● ‘अभी ज़िंदा है माँ मेरी मुझे कुछ भी नहीं होगा, मैं घर से जब निकलता हूँ दुआ भी साथ चलती है।’
● ‘जब भी कश्ती मिरी सैलाब में आ जाती है, माँ दुआ करती हुई ख्वाब में आ जाती है।’
● ‘तेरे दामन में सितारे हैं तो होंगे ऐ फलक, मुझ को अपनी माँ की मैली ओढ़नी अच्छी लगी।’
● ‘माँ ख्वाब में आ कर ये बता जाती है हर रोज़, बोसीदा सी ओढ़ी हुई इस शाल में हम हैं।’