Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शिक्षण मंत्रालयाकडून ‘प्रेरणा’ कार्यक्रमाचा प्रारंभ

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ‘प्रेरणा : अनुभवात्मक अध्ययन कार्यक्रम’ सुरू केला आहे. सर्व सहभागींना अर्थपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, हा यामागचा उद्देश आहे.

अधिक माहिती
● राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 ची आधारशीला असलेले मूल्याधारित शिक्षणाचे तत्त्वज्ञान आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या तत्त्वांचे एकात्मीकरण याप्रती दृढ वचनबद्धतेने प्रेरणा प्रेरित आहे.
● नववी ते बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा हा आठवडाभराचा निवासी कार्यक्रम आहे.
● तंत्रज्ञानात सर्वोत्तम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक अनुभवात्मक आणि प्रेरणादायी शिक्षण कार्यक्रम आहे. वारसा आणि नवाचार यांचा संगम यात आहे.
● देशाच्या विविध भागातून दर आठवड्याला 20 निवडक विद्यार्थ्यांची तुकडी (10 मुले आणि 10 मुली) या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
● दिवसनिहा कार्यक्रमाच्या वेळापत्रकात योग, उत्फुल्लता आणि ध्यान सत्रे, त्यानंतर अनुभवात्मक अध्ययन , संकल्पनात्मक सत्रे आणि मनोरंजक शिक्षण क्रियाकलाप असतील. यासाठी विद्यार्थी पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात.
● नोंदणीकृत अर्जदार पोर्टलवर विहित केलेल्या निवड प्रक्रियेतून जातील. आपल्या राष्ट्राचे भविष्य घडविण्यास उत्सुक असलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचे मूल्यमापन करण्यासाठीच्या प्रेरणाच्या तत्त्वावर आधारित विविध उपक्रमांद्वारे नियोजित ‘प्रेरणा उत्सव’ दिवशी शाळा/तालुका स्तरावर आयोजित निवड प्रक्रियेत अर्जदारही सामील होऊ शकतात.
● निवड झाल्यावर, 20 सहभागी (10 मुले आणि 10 मुली) प्रेरणा कार्यक्रमात सहभागी होतील आणि प्रेरणा, नवोन्मेष आणि आत्मशोधाच्या प्रवासाला सुरुवात करतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *