Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शुभांशु शुक्लाचे पृथ्वीवर आगमन Shubanshu Shukla’s arrival on Earth

Shubanshu Shukla's arrival on Earth

● ‘अॅक्सिअम-४’ मोहिमेंतर्गत भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चौघे सुखरूप पृथ्वीवर परतले.
● राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेले ते दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत.
● भविष्यातील भारताच्या ‘गगनयान’ मोहिमांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
● आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर शुक्ला ‘ड्रॅगन’ या अवकाशकुपीतून (स्पेस कॅप्सूल) अमेरिकेतील प्रशांत कॅलिफोर्नियाजवळ महासागरात उतरले.
● या वेळी त्यांच्याबरोबर मोहिमेचे नेतृत्व करणारे अमेरिकेच्या पेगी व्हाइटसन, पोलंडचे अंतराळवीर स्लावोझ उझ्नान्स्की आणि हंगेरीचे टिबर कापू होते.
● भारतीय वेळेनुसार 15 जुलै रोजी दुपारी 3.01 वाजता त्यांचे यान पृथ्वीवर दाखल झाले.
● भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने मोहिमेसाठी 550 कोटी रुपयांचा खर्च केला असून शुक्ला यांनी अंतराळात केलेले प्रयोग आणि निरीक्षणांचा उपयोग भारताची मानवी अवकाश मोहीम ‘गगनयान’ मध्ये होणार आहे.

मोहिमेची वैशिष्ट्ये

● चार दशकांनंतर भारतीय अंतराळवीराची अवकाशात झेप.
● ग्रुप कॅप्टन शुक्ला अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय.
● २६ जून ते १३ जुलै असे १८ दिवस अवकाश स्थानकात मुक्काम.
● शून्य गुरुत्वाकर्षणासंबंधी शुक्ला यांचे सात प्रयोग.
● अंतराळातून पंतप्रधान मोदींसह, विद्यार्थी, ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांशी संवाद.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *