बांगलादेश बाराव्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘आवामी लीग ‘पक्षाने सलग चौथ्यांदा निर्विवाद बहुमत यश मिळवले. शेख हसीना यांनी 300 पैकी 222 जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना यांनी गोपालगंज-3 मतदारसंघातून पुन्हा एकदा दमदार विजय नोंदविला आहे. त्यांना दोन लाख 49 हजार 965 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि बांगलादेश सुप्रीम पार्टीचे एम .निजामुद्दीन लष्कर यांना केवळ 469 मते मिळाली. पंतप्रधान पदाच्या नात्याने त्यांचा आता पाचवा कार्यकाळ असेल.
शेख हसीना
● बांगलादेशातील समर्थकांसाठी आयर्न लेडी असणाऱ्या आणि विरोधकांकडून हुकूमशहा म्हणून टीका होणाऱ्या 76 वर्षीय शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान होत आहेत.
● बांगलादेशी संस्थापक शेख मुजिबूर रहमान यांची कन्या असलेल्या हसीना 2009 या वर्षापासून बांगलादेशात सत्तेत आहेत.
● सप्टेंबर 1949 मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जन्मलेल्या शेख हसीना या 1960 च्या दशकात उत्तरार्धात ढाका विद्यापीठात शिकत असताना राजकारणात सक्रिय होऊ लागल्या.
● 1971 मध्ये स्वतंत्र मिळाल्यानंतर मुजिबुर रहमान हे अध्यक्ष आणि नंतर पंतप्रधान झाले. मात्र ऑगस्ट 1975 मध्ये रहमान त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांची राहत्या घरी सैनिक अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली.
● प्रदेशात असल्याने या हल्ल्यातून हसीना आणि त्यांची लहान बहीण बचावल्या त्यानंतर त्यांनी भारतात सहा वर्षे आश्रय घेतला.
● मुजिबुर रहमान यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या हसीना यांना अवामी लीगच्या नेत्या म्हणून निवडले.
● 1981 मध्ये हसीना या मायदेशी परतल्या मात्र सैनिकी शासकाने त्यांना अनेकदा नजर कायद्यात ठेवले.
● 1991 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीग पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि खालिदा झिया या पंतप्रधान झाल्या. पाच वर्षानंतर 1996 च्या निवडणुकीनंतर हसीना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या.