● भारताच्या टपाल विभागाने, दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष स्मृती टपाल तिकीटाचे प्रकाशन केले.
● हा कार्यक्रम केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केला गेला होता.
● या कार्यक्रमात देशभक्तीपर वाद्यवृंदाचे सादरीकरण तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन, वारसा आणि योगदानावर आधारित प्रदर्शनाचा अंतर्भाव असलेला एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.
● श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक होते.
● ते एक शिक्षणतज्ञ आणि वकील देखील होते.
● त्यांनी भारताच्या फाळणीला विरोध केला आणि काश्मीरसाठी ‘एक राष्ट्र, एक निशान, एक विधान’ (one nation, one flag, one constitution) ही संकल्पना मांडली.
● कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले
● ते हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीचे प्रणेते मानले जातात.
● ते जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात उद्योग आणि पुरवठा मंत्री होते.