शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांच्यासह लोकसभेच्या पाच खासदारांची यावर्षीच्या ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
अधिक माहिती
● भारतीय जनता पक्षाचे सुकांत मुजुमदार आणि सुधीर गुप्ता ,तसेच काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा हे इतर तिघे पुरस्कार प्राप्त खासदार आहेत.
● दिल्लीमध्ये 17 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान केले जातील.
● लोकसभा सदस्यांच्या सभागृहातील कामगिरीच्या आधारे सर्वोत्कृष्ट पाच जणांना ‘संसद रत्न’ पुरस्कार दिले जातात .तर लोकसभेच्या कार्यकाळात चांगल्या कामगिरीत सातत्य राखणाऱ्यांना पाच वर्षातून एकदा ‘संसद महारत्न पुरस्कार’ चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन या धर्मादाय ट्रस्ट कडून देण्यात येतो.