- भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) श्वसन करणाऱ्या इंधन यंत्रणेची (एअर ब्रीदिंग प्रॉपल्शन टेक्नॉलॉजी) श्रीहरिकोटा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- या चाचणीसाठी ‘आरएच 560’ हे साउंडिंग रॉकेट वापरण्यात आले.
- या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यातील कमी खर्चाच्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेटमध्ये केला जाणार आहे.
- ‘इस्रो’ तर्फ गेल्या महिन्यात भविष्यवेधी रियूजेबल लाँच वेहिकलच्या(आरएलव्ही) लँडिंग प्रयोगाची तिसरी आणि अखेरची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- या चाचणीमधून अमेरिकी अवकाश यानासारख्या दिसणाऱ्या पुष्पक यानाला जमिनीपासून चार किलोमीटर उंचावर नेऊन स्वयंचलित पद्धतीने धावपट्टीवर विमानासारखे उतरवण्यात आले.
- आता या यानाला कमी खर्चात अवकाशात नेऊ शकणाऱ्या तंत्रज्ञानाची दुसरी चाचणीही यशस्वी झाली.
- श्रीहरिकोटा येथे 22 जुलै रोजी सकाळी चाचणीवेळी रोहिणी साउंडिंग रॉकेटला ‘इस्रो’ ने विकसित केलेले स्क्रॅमजेट इंजिन जोडण्यात आले होते.
- रॉकेट वातावरणातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने प्रवास करत असताना ‘स्क्रॅमजेट’च्या साह्याने वातावरणातील ऑक्सिजन शोषला जाऊन त्याचा वापर ‘ऑक्सिडायझर’ म्हणून केला जातो.
- या तंत्रज्ञानामुळे रॉकेटमधील इंधनाच्या मिश्रणात वापरण्यात येणाऱ्या ‘ऑक्सिडायझर’ चे वजन कमी होऊन रॉकेट हलके होते आणि खर्चातही बचत होते.
कमी खर्चात अवकाश प्रवास शक्य
- या चाचणीत विविध 110 प्रकारच्या घटकांची पडताळणी करण्यात आली.
- हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष वातावरणात वापरण्याआधी विक्रम साराभाई अवकाश केंद्र, लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम सेंटर आणि नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरी येथे जमिनीवरील चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या होत्या.
- याआधी या तंत्रज्ञानाची पहिली चाचणी 28 ऑगस्ट 2016 रोजी यशस्वी झाली होती.
- भविष्यात श्वसन करणारे रॉकेट आणि पुनर्वापर करता येणारे यान यांच्या साह्याने कमी खर्चात अवकाश प्रवास किंवा उपग्रह प्रक्षेपणाची ‘इस्रो’ची योजना आहे.
- स्क्रॅमजेट तंत्रज्ञान अवगत असलेला भारत हा जगातील चौथा देश आहे.