घरगुती हिंसाचार ,बालमजुरी, चुकलेले ,घर सोडून पळून गेलेल्या अशा अनेक अडचणीत सापडलेल्या मुलांसाठी 1098 हे 24 तास सुरू असलेली चाईल्डलाईन हेल्पलाइन सेवा सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे ही सेवा चालवणाऱ्या ज्ञानदेवी संस्थेकडून 7 सप्टेंबर पासून ‘बाल आधार’ ही पीडित मुलांना दूरध्वनी वरून मदतीसाठी पर्यायी सेवा सुरू करण्यात येत आहे. ज्ञानदेवी संस्थेमार्फत 2001 पासून 1098 ही फोन सुविधा राबविण्यात येत होती मात्र केंद्र सरकारने मुलांसाठीची हेल्पलाइन ही सामाजिक संस्था ऐवजी स्वतः राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चाईल्ड लाईन ही मुलांसाठीची 24 तास मोफत फोन सेवा 1 सप्टेंबर 2023 पासून सरकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली.


