ब्रिजभूषण यांचे निष्ठावंत संजयसिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ब्रिजभूषण यांच्या गटाने 15 पैकी 13 जागा जिंकून बाजी मारली. उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष असलेल्या संजयसिंह यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी अनिता शेरॉन यांचा 40-7 असा सहज पराभव केला.
संजय सिंह
• संजयकुमार सिंह हे बबलू नावानंही ओळखले जातात.
• ते उत्तर प्रदेशच्या कुस्तीसंघाचे आणि राष्ट्रीय कुस्ती संघ या दोन्ही ठिकाणी पदाधिकारी आहेत.
• सन 2019 मध्ये भारतीय कुस्ती संघाच्या कार्यकारी कमिटीमध्ये संयुक्त सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती. म्हणजेच WFI च्या गेल्या कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता.
• उत्तर प्रदेशातील चांदौली इथले ते रहिवासी आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा हे कुस्तीचे सामने भरवत असायचे. त्यामुळेच संजय सिंह यांच्यावरही कुस्तीचे संस्कार झाले.
• 2008 मध्ये ते वाराणसी कुस्ती संघाचे जिल्हाध्यक्ष बनले. त्यानंतर 2009 मध्ये उत्तर प्रदेशचा कुस्ती संघ तयार झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह प्रदेशाध्यक्ष बनले आणि संजय सिंह उपाध्यक्ष.
• पूर्वांचलच्या महिला कुस्तीपटूंना राष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.
• संजयकुमार सिंह हे ब्रिजभूषण सिंहच्या जवळचे सहकारी मानले जातात. या दोघांचे कौटुंबिक संबंध आहेत. गेल्या तीन दशकांपासून हे दोघेही कुस्तीसाठी सोबत काम करत आहेत.
भारतीय कुस्ती महासंघ
• रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ( WFI ) ही भारतातील कुस्तीची प्रशासकीय संस्था आहे .
• स्थापना: 27 जानेवारी 1967
• मुख्यालय: नवी दिल्ली