● महाराष्ट्रातील लोकसभेचे खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाड, नरेश मस्के, स्मिता वाघ आणि राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह 17 खासदारांना 15 व्या संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
● संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
● माजी राष्ट्रपती स्व. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून 2010 मध्ये ‘प्राइम पाँइट फाउंडेशन’ आणि ‘ई-मॅगझीन प्रीसेन्स’ यांनी सरू केलेल्या या पुरस्काराचे हे 15 वे वर्ष होते.
● प्रश्न विचारणे, विधेयकांवरील तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाच्या आधारे हे पुरस्कार देण्यात येतात.
● पुरस्कार विजेत्यांची निवड माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केली.
● महाराष्ट्राच्या खासदारांव्यतिरिक्त भर्तृहरी महताब, निशिकांत दुबे, विद्युत बरन महतो, पी.पी. चौधरी, दिलीप सैकिया, रवी किशन, मदन राठोड, प्रवीण पटेल (सर्व भाजप), सी.एन. अण्णादुराई (द्रमुक) आणि एन.के.प्रेमचंद्रन (आरएसपी)या खासदारांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला.
● याशिवाय संसदेच्या वित्त आणि कृषी विभागांशी संबंधित स्थायी समित्यांचाही पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
● या समित्यांचे अध्यक्ष अनुक्रमे भर्तृहरी महताब आणि चरणजितसिंग चन्नी हे होते.
● सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांचा सोळाव्या, सतराव्या आणि अठराव्या लोकसभेत संसदीय लोकशाहीतील सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष गौरव करण्यात आला आहे.
राज्यातील विजेते
● सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार), अरविंद सावंत (शिवसेना-उबाठा), डॉ. मेधा कुलकर्णी (भाजप), नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस), श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना) आणि स्मिता उदय वाघ (भाजप)