सन 2023 आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. कोपर्निकस या युरोपीयन पर्यायावरण विषयक संस्थेने ही माहिती दिली.
सन 2015 च्या पॅरिस करारानुसार वार्षिक जागतिक तापमान वाढ औद्योगिक क्रांती पूर्व कालखंडातील तापमानापेक्षा 1.5 अंशापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. जानेवारी 2024 देखील नेहमीपेक्षा अधिक उष्ण असण्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे.
कोपर्निकस या अहवालातील निरीक्षणे
● सन 2023 मधील वार्षिक सरासरी तापमान 14.98 अंश सेल्सिअस
● सन 2023 मधील सरासरी तापमान एक षष्ठअंश सेल्सिअस जे की सन 2016 मधील वाढीपेक्षा अधिक
● जून ते डिसेंबर हे सलग सात महिने तापमान सरासरीपेक्षा अधिक
तापमानवाढीची कारणे
● कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इत्यादींच्या ज्वलनामुळे वाढते उत्सर्जन
● मध्य प्रशांत महासागरातील एल निनो प्रवाह
● याखेरीज आर्क्टिक, दक्षिण आणि हिंदी महासागरातील नैसर्गिक घडामोडी
● सौर क्रियांमध्ये झालेली वाढ
● 2022 मध्ये समुद्रातळाशी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक