Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

समुद्राच्या पाण्याच्या निःक्षारीकरणासाठी डीआआरडीओद्वारे उच्च-दाब पॉलिमेरिक पटल विकसित DRDO develops high-pressure polymeric panels for seawater desalination

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • May 2025
  • समुद्राच्या पाण्याच्या निःक्षारीकरणासाठी डीआआरडीओद्वारे उच्च-दाब पॉलिमेरिक पटल विकसित DRDO develops high-pressure polymeric panels for seawater desalination
DRDO develops high-pressure polymeric panels for seawater desalination

● संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात DRDO ने समुद्राच्या पाण्यातील क्षार विलग करण्यासाठी स्वदेशी नॅनोपोरस बहुपदरी पॉलिमरिक मेम्ब्रेन
अर्थात अतिसूक्ष्म छि्द्र असलेले पटल यशस्वीरित्या विकसित केले आहे.
● डिफेन्स मटेरिअल्स स्टोअर्स अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) या DRDO च्या कानपूर स्थित प्रयोगशाळेने, भारतीय तटरक्षक दलाच्या
(ICG) जहाजांमधील डिसॅलिनेशन प्रकल्पांसाठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
● यामुळे समुद्राचे खारे पाणी क्लोराईड आयनच्या संपर्कात आल्यावर निर्माण होणाऱ्या स्थिरतेच्या गंभीर समस्येमुळे कार्यचालनानात येणारी अडचण दूर
करण्याच्या गरजेच्या अनुषंगाने हे संशोधन करण्यात आले आहे. आठ महिन्यांच्या विक्रमी वेळेत ही मेम्ब्रेन विकसित करण्यात आली आहे.
● डिफेन्स मटेरिअल्स स्टोअर्स अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ने भारतीय तटरक्षक दलासोबत त्याच्या ऑफशोर पेट्रोलिंग व्हेसेल (OPV) मध्ये
असलेल्या सध्याच्या डिसॅलिनेशन यंत्रणेत सुरुवातीला घेतलेल्या तांत्रिक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
● पॉलिमरिक मेम्ब्रेनच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये त्यांचे कार्य समाधानकारक होत असल्याचे आढळले.
● 500 तासांच्या ऑपरेशनल चाचणीनंतर भारतीय तटरक्षक दलाकडून त्याला अंतिम परिचालनाची मंजुरी दिली जाईल.
● सध्या युनिटच्या ओपीव्हीवर चाचण्या घेण्याचे आणि परीक्षणाचे काम सुरू आहे.
● काही सुधारणांनंतर किनारी भागात समुद्राच्या पाण्याचे निःक्षारीकरण करण्यासाठी ही मेम्ब्रेन वरदान ठरेल.
● आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत डिफेन्स मटेरिअल्स स्टोअर्स अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट DMSRDE चे हे आणखी एक पाऊल आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *