Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सरन्यायाधीशपदी न्या. भूषण गवई Justice Bhushan Gavai as Chief Justice

Justice Bhushan Gavai as Chief Justice

● न्या. भूषण रामकृष्ण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश होतील. 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.
● ज्येष्ठतेत अव्वल असलेले न्या. गवई यांच्या नावाची परंपरेनुसार आपले उत्तराधिकारी म्हणून विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारच्या विधी व
न्याय मंत्रालयाकडे शिफारस केली आहे.
● न्या. गवई हे भारताचे सहावे मराठी भाषक सरन्यायाधीश असतील.
● न्या. गवई यांच्याआधी आतापर्यंत न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्या. यशवंत चंद्रचूड, न्या. शरद बोबडे, न्या. उदय लळित आणि न्या. धनंजय चंद्रचूड या मराठी
न्यायाधीशांना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान लाभला आहे.
● न्या. भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला.
● न्या. भूषण गवई हे केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच दिवंगत रिपब्लिकन नेते रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत.
● 16 मार्च 1985 रोजी ते बार असोसिएशनमध्ये रुजू झाले.
● 1987पर्यंत त्यांनी उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता आणि दिवंगत न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले.
● त्यानंतर 1987 ते 1990 या काळात मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली.
● न्या. भूषण गवई हे नागपूर व अमरावती महापालिका तसेच अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.
● 1990 नंतर, त्यांनी मुख्यतः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली.
● घटनात्मक कायदा आणि प्रशासकीय कायद्यात त्यांची तज्ज्ञता आहे.
● नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, अमरावती विद्यापीठ, विविध स्वायत्त संस्था आणि महामंडळे आणि विदर्भातील विविध नगरपरिषदांची
बाजू त्यांनी विविध प्रकरणांमध्ये मांडले.
● ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 पर्यंत त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात साहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील, तर 17
जानेवारी 2000 रोजी त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.
● 14 नोव्हेंबर 2003 रोजी त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली व 12 नोव्हेंबर 2005 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे
कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.
● उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी खंडपीठावर विविध पीठांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
● 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती झाली.
सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य
● सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे न्या. गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत.
● याआधी न्या. महम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते.

आत्तापर्यंतचे महाराष्ट्रातील सरन्यायाधीश

1) न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (१ फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६, २ वर्षे ४२ दिवस)
2) न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड (२२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५, ७ वर्षे १३९ दिवस)
3) न्या. सॅम पिरोज भरुचा (१ नोव्हेंबर २००१ ते ५ मे २००२, १८५ दिवस)
4) न्या. सरोश होमी कपाडिया (१२ मे २०१० ते २८ सप्टेंबर २०१२, २ वर्षे

१३९ दिवस)

5) शरद बोबडे (१८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१, १ वर्ष १५६ दिवस)
6) न्या. उदय लळित (२७ ऑगस्ट २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२, ७३ दिवस)
7) न्या. धनंजय चंद्रचूड (९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४, २ वर्षे १ दिवस)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *