Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘सर्ट-इन’चा ‘मास्टरकार्ड’ शी करार

  • Home
  • Current Affairs
  • ‘सर्ट-इन’चा ‘मास्टरकार्ड’ शी करार
  • केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सर्ट-इन) या सरकारी संस्थेने मास्टरकार्ड इंडिया या क्रेडिट कार्ड क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीशी सहकार्य करून वित्तीय क्षेत्रातील सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य व माहितीच्या देवाणघेवाणीसाठी एक सामंजस्य करार केला आहे.
  • नुकतीच दोन्ही संस्थांच्या वतीने या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
  • यावेळी वाणिज्य व वस्त्रोद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि मास्टरकार्डचे दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष गौतम अग्रवाल उपस्थित होते.
  • या कराराअंतर्गत या दोन्ही संस्था सायबर सुरक्षा घटना प्रतिसाद, क्षमता निर्मिती, वित्तीय क्षेत्रासाठी विशिष्ट सायबर धोक्याची माहिती सामायिक करणे आणि प्रगत मालवेअर विश्लेषण याबाबतच्या परस्पर प्राविण्याचा लाभ घेणार आहेत.
  • ‘मास्टरकार्ड’ आणि ‘सर्ट- इन’ सायबर क्षमता निर्मिती, बाजारातील अद्ययावत कल आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करणार असून, वित्तीय संस्थांची सायबर सुरक्षा वाढविणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *