शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत वाशीम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषद शाळा (शासकीय गट) आणि नाशिकमधील एस्पेलियर हेरिटेज स्कूल बेळगाव धागा (खासगी गट) या शाळांना पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले.
अधिक माहिती
• पुणे जिल्ह्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतनने (शारदानगर, बारामती) खासगी शाळा गटात राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.
• विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आला.
• त्यानुसार 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी कालावधीत राज्यात हे अभियान राबविण्यात आले.
• या अभियानात सरकारी आणि खासगी व्यवस्थापनाच्या एकूण एक लाख तीन हजार 312 शाळांनी सहभाग नोंदविला. या शाळांमधील 1 कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी अभियानात सहभागी झाले होते.
• मूल्यांकनाच्या आधारे राज्यस्तरीय, बृहन्मुंबई महापालिका, ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग महापालिका, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अशा स्तरावरील पारितोषिक शिक्षण विभागाने जाहीर केले.
अभियानातील सहभाग
• एकूण शाळा – 1,03,312
• शासकीय – 64,312
• खासगी – 39,000
• विद्यार्थी – 1,04,64,420
• विद्यार्थिनी – 94,97,166
• एकूण – 1,99,61,586
अशा प्रकारे केले गेले मूल्यांकन
• कागदाचा वापर टाळत संगणकीय प्रणाली राबविणे
● आर्थिक साक्षरता, वीजबचत
● डिजिटल उपकरणाचा वापर, वैज्ञानिक दृष्टीकोन
● लोकशाही मूल्यांचा वापर
● वृक्षसंवर्धन, मूल्य संस्कार, स्वच्छतेच्या सवयी