बॅडमिंटन विश्वातील आपला दबदबा कायम राखताना भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी(आमलापुर,आंध्र प्रदेश) आणि चिराग शेट्टी(मुंबई, महाराष्ट्र) जोडीने यावर्षी हंगामातील चौथे विजेतेपद मिळवले. सात्विक- चिराग जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या फजर अलफियान आणि महम्मद रियान ऑड्रियांतो या इंडोनेशिया जोडीचा 17- 21, 21-13, 21 -14 असा पराभव करीत कोरिया ओपन स्पर्धा सुपर 500 जिंकली. या जोडीने यावर्षी कामगिरीत कमालीचे सातत्य राखले यावर्षीच्या हंगामात त्यांनी सलग 10 सामने जिंकण्याची कामगिरी करून दाखवली.
2023 मधील सात्विक-चिरागची विजेतेपदे:
1) स्विस ओपन सुपर 300
2)आशियाई अजिंक्यपद स्पर्धा
3)इंडोनेशिया ओपन सुपर 1000
4) कोरिया ओपन सुपर 500
2023 कोरिया ओपन ही बॅडमिंटन स्पर्धा एकूण 30 वी स्पर्धा होती.
18 ते 23 जुलै 2023 या कालावधीत दक्षिण कोरियाच्या येओसू येथील जिन्नम स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविण्यात आली होती.


