सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळे होणारा त्रास याविषयी तक्रार करण्यासाठी आणि या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘चक्षु’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. व्हॉट्स अॅप, मोबाइल संदेश किंवा कॉल आदी माध्यमांतून या पोर्टलवर गुन्ह्यांबाबत तक्रारी करता येतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
अधिक माहिती
• मागील वर्षी मे महिन्यात या पोर्टलचे उद्घाटन झाले होते.
• ते प्रत्यक्षात 5 मार्च पासून कार्यरत करण्यात आले.
• ‘हे पोर्टल दूरसंचार विभागाच्या संचार साथी संकेतस्थळावर उपलब्ध असेल,’ असे केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
• व्हॉट्सअप, एसएमएस आणि कॉलवरील बनावट संदेशांमुळे होणारी सायबर फसवणूक लक्षात घेऊन हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
• ‘चक्षु’द्वारे, आर्थिक घोटाळे, बनावट ग्राहकांची जाहिरात, बनावट सरकारी अधिकारी, बनावट नोकऱ्या आणि कर्ज देऊ करणे, शेअर बाजारातील गुंतवणूक याद्वारे तोतयागिरी करणारे, तसे संदेश पाठवणारे किंवा मोबाइल कॉल करणारे यामुळे अनेक जण त्रस्त असतात. यापुढे संशयास्पद कॉल, संदेश किंवा संभाषणाच्या तक्रारी ‘चक्षु’वर करता येतील.
• ‘चक्षू’च्या मदतीने सायबर फसवणूक ओळखण्याची गती वाढेल.