‘सी – प्लेन‘ ची यशस्वी चाचणी
- गुवाहाटीतील एका विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर ब्रह्मपुत्र नदी किनाऱ्यावर पांडू घाट येथे प्रथमच एक ‘सी प्लेन’ उतरले.
- राज्याच्या दळणवळणात सी प्लेनचा समावेश झाल्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
- यशस्वी विमान उतरणारे हे पहिलेच सीप्लेन आहे.
- दरम्यान जलमार्गावर सी प्लेन व्यवस्था सुरू करण्यास वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
- ‘आसामच्या पर्यटन आणि अंतर्गत दळणवळण क्षेत्रात नवीन शक्यतांची पहाट’ अशा आशयासह राज्याचे पर्यटनमंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी समाजमाध्यमावर मत व्यक्त केले.
शांघाय सर्वाधिक प्रदूषित शहर
- अमेरिका आणि आशियातील शहरांमधून सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. त्यातून तापमान वाढीमध्ये भर पडते. यामध्ये शांघाय सर्वाधिक प्रदूषित शहर आहे, अशी माहिती एका अहवालामध्ये समोर आली आहे. अन्य शहरांमध्ये न्यूयॉर्क, टोकियो, ह्यूस्टन या शहरांचाही समावेश आहे.
- अझरबैजान येथे भरलेल्या जागतिक हवामान परिषदेत (कॉप 29) एक अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये ही माहिती समोर आली आहे.
- सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या प्रांतांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये एक अब्ज टनांपेक्षा जास्त हरितगृह वायूचे उत्सर्जन करणाऱ्या प्रांतांमध्ये सातपैकी सहा प्रांत चीनमधील आहेत.
- यामध्ये उपग्रहांतून मिळणारी निरीक्षणे आणि अन्य माहितीच्या आधारावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- कार्बनडाय ऑक्साइड आणि मिथेनमुळे होणारे प्रदूषण 7 ट्क्यांनी वाढले आहे, असेही यात नमूद केले आहे.
- सन 2022 ते 2023 या काळामध्ये चीन, भारत, इंडोनेशिया आणि रशिया या देशांमध्ये सर्वाधिक हरितगृह वायूंचे प्रदूषण झाले आहे.
- तर व्हेनेझुएला, जपान, जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिकेतील प्रदूषणामध्ये मोठी घट झाल्याचे या अहवालातून नमूद करण्यात आले आहे.
अंशुल कंबोजचा विक्रम
- हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.
- त्यांनी केरळ विरुद्ध च्या एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला .
- लाहलीतील चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियम मध्ये हरियाणा आणि केरळ यांच्यातील रणजी लढतीत 23 वर्षीय अंशुलने दहा बळी घेतले.
एका डावात दहा विकेट घेणारा अंशुल तिसराच गोलंदाज
- रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत डावात 10 विकेट घेणारा अंशुल तिसराच गोलंदाज ठरला.
- यापूर्वी जानेवारी 1957 मध्ये बंगालच्या प्रेमांगसू चॅटर्जी यांनी आसाम विरुद्धच्या रणजी लढतीत 20 धावा देत 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.
- तर नोव्हेंबर 1985 मध्ये राजस्थानच्या प्रदीप सुंदरम यांनी विदर्भ विरुद्ध 78 धावात दहा विकेट घेतल्या होत्या.
- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा विकेट घेणारा अंशुल एकूण सहावा भारतीय गोलंदाज.
- याआधी प्रेमाँगसू चॅटर्जी, प्रदीप सुंदरम, सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे ,देवाशिष मोहंती यांनी असा पराक्रम केला होता.