- राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची निवड करण्यात आली.
- 30 जून रोजी मावळते मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्याकडून सुजाता यांनी सूत्रे स्वीकारली.
- त्यांचा कार्यकाळ जून 2025 पर्यंत एक वर्षाचा राहणार आहे .
- ते राज्याचे 45 वे मुख्य सचिव आहेत.
- 1987 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या सुजाता सौनिक या सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत.
- सौनिक यांनी आपल्या 37 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे. सौनिक यांनी सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन,कौशल्य विकास, प्रशासन अशा अनेक विभागांत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या आणि राज्य तसेच केंद्र सरकारमध्ये विविध पातळीवर धोरणे तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
- तसेच कंबोडिया आणि कोसोवो येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये काम केले आहे.
- तसेच त्यांनी केंद्र सरकार आणि संयुक्त राष्ट्रातही विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
- मूळच्या हरियाणातील असलेल्या सुजाता सौनिक यांनी आपले शालेय शिक्षण चंदिगड येथे पूर्ण केले तर पंजाब विद्यापीठातून इतिहास या विषयात एमए केले आहे.
- सैनिकी यांनी विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक देखील पटकावले होते.
राज्याच्या इतिहासात प्रथमच प्रशासन, पोलीस प्रमुखपदी महिला अधिकारी
- सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने राज्याच्या इतिहासात प्रथमच प्रशासन आणि पोलीस दलाच्या प्रमुखपदी महिला अधिकारी विराजमान झाले आहेत.
- 2017 मध्ये कर्नाटकात अशाच प्रकारे दोन्ही महिला अधिकारी सर्वोच्च पदावर होत्या.
- 2017 मध्ये मुख्य सचिवपदी के. रत्नप्रभा तर पोलीस महासंचालपदी निलमणी एम. राजू या दोन्ही एकाच वेळी सर्वोच्चपदी होत्या. त्यानंतर राज्यात दोन्ही महिला अधिकारी सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत.
- मुख्यमंत्रीपदाचा अपवाद वगळता मुख्य न्यायमूर्तीपासून ते मुख्य सचिवापर्यंत विविध पद भूषवण्याची संधी राज्यात महिलांना आतापर्यंत मिळाली आहे.
पती-पत्नी मुख्य सचिवपदी असण्याची पहिलीच वेळ
- सुजाता सौनिक या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्या जून 2025 मध्ये निवृत्त होत आहेत.
- निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या त्या पत्नी आहेत. तेदेखील राज्याचे मुख्य सचिव होते.
- त्यामुळे पती आणि पत्नी यांनी हे पद भूषविण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.
- कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, सरकारच्या सल्लागार आणि सहसचिव अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.