- लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका आणि सुधा मूर्ती यांना 2024 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आला असल्याने एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले आहे.
- लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त 1- ऑगस्ट दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मूर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- ज्येष्ठ नेते च शरद पवार, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.
- 2024 हे या पुरस्काराचे 42 वे वर्ष आहे.
- सुधा मूर्ती या नामवंत लेखिका आहेत. त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या सहसंस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे.
- कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळूर शहर व परिसरात त्यांनी सुमारे दहा हजार स्वच्छतागृहे उभारली आहेत.
- ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य देशाच्या विकासाला चालना देणारे ठरले आहे.
- श्री साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही , महत्त्वाचे आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मराठी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमधून त्यांनी लेखन केले आहे.”
पुरस्काराची सुरवात:
- लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली.
- एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
- 1983 या वर्षी पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार एस. एम.जोशी यांना प्रदान करण्यात आला होता.
पुरस्काराचे पूर्वीचे मानकरी:
एस. एम. जोशी ,गोदावरी परुळेकर, इंदिरा गांधी ,श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, खान अब्दुल गफार खान ,सुधाताई जोशी, मधु लिमये, बाळासाहेब देवरस, पांडुरंग शास्त्री आठवले, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, टी. एन. शेषन, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉक्टर मनमोहन सिंग, डॉक्टर आर. चिदंबरम, डॉ. विजय भटकर, राहुल बजाज ,प्राध्यापक एम. एस. स्वामीनाथन ,डॉ. वर्गीस कुरियन, रामोजी राव, एन. आर. नारायण मूर्ती, सॅम पित्रोदा, जी माधवन नायर, डॉ. ए. सिवाथानू पिल्लई, मॉन्टेकसिंग अहलुवालिया, प्रणव मुखर्जी, शीला दीक्षित ,डॉक्टर कोटा हरि नारायण, डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे ,डॉक्टर श्रीधरण ,डॉक्टर अविनाश चंदेर, सुबैया अरुणन, शरद पवार, आचार्य बाळकृष्ण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉक्टर सायरस पुनावाला, डॉक्टर टेसी थॉमस , नरेंद्र मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.